मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांनी महायुती सरकारविरुद्ध एल्गार पुकारला असून सोमवारपासून हजारो कर्मचारी बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. प्रलंबित मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने हे पाऊल उचलावे लागत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेने केला आहे. मुंबईतील सर जे.जे. रुग्णालय, जी.टी. रुग्णालय, कामा रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, वांद्रे येथील नागरी स्वास्थ्य केंद्र आणि वरळीतील पोदार आयुर्वेद महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी या बेमुदत साखळी उपोषणात सहभागी होणार आहेत. आझाद मैदान येथे हे उपोषण केले जाणार आहे.