प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची नुकसानभरपाई घोषित केली. मात्र, बागपत येथे जैन मंदिरात लाकडी खांब पडून झालेल्या दुर्घटेत 7 जैन भाविकांचा मृत्यू झाला असताना त्यांच्या नातेवाईकांसाठी कोणत्याही प्रकारच्या नुकसानभरपाईची घोषणा केली गेली नाही. दोन्ही घटना हिंदुस्थानमधील असून दोन्ही घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेले हिंदुस्थानी आहेत. त्यामुळे दोन्ही घटनांमधील भाविकांमध्ये भेदभाव न करता पुंभमेळ्यातील भाविकांच्या नातेवाईकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईप्रमाणे जैन भाविकांच्या नातेवाईकांनाही नुकसानभरपाई जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष हार्दिक हुंडिया यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.