![bank-of-maharashtra-1 bank-of-maharashtra-1](https://www.saamana.com/wp-content/uploads/2019/07/bank-of-maharashtra-1-3-696x447.jpg)
बँक ऑफ महाराष्ट्रात स्पेशालिस्ट ऑफिसरच्या 172 पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी बुधवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. बीटेक किंवा बीई कम्प्युटर सायन्स, इन्पर्ह्मेशन टेक्नोलॉजी पूर्ण करणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराला किमान 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 60 हजार ते 1 लाख रुपये पगार मिळेल. भरतीसंबंधी सविस्तर माहिती bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.