हिंदुस्थानने स्वदेशी रॉकेट लाँचर सिस्टम ‘पिनाका’ची निर्मिती केलेय. ‘पिनाका’मुळे शत्रूची झोप उडणार आहे. अवघ्या 44 सेकंदांत 12 रॉकेट डागता येतील. शत्रू कितीही दूरवर असू द्या, ‘पिनाका’ अचूक वेध घेऊ शकेल. ‘पिनाका’ रॉकेट लाँचर सिस्टमच्या यशस्वी चाचणीनंतर आता त्यांची खरेदी प्रक्रिया सुरू होईल. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने त्याच्या खरेदीस मंजुरी दिली आहे.
गेल्या वर्षी डीआरडीओने ‘पिनाका’ रॉकेट सिस्टमची चाचणी केली होती. वेगवेगळ्या फिल्ड फायरिंग रेंजमध्ये परीक्षण करण्यात आले, जेणेकरून त्याचा आवाका तपासता येईल. ही चाचणी यशस्वी झाली होती. कमी वेळेत जास्त दूरवर मारा अशी ‘पिनाका’ची खासियत आहे. चार सेकंदात एक रॉकेट सोडू शकते. अशी 44 सेकंदात 12 रॉकेट सोडण्याची ‘पिनाका’ची क्षमता आहे. त्याची मारक क्षमता 45 किलोमीटर आहे. म्हणजे हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या सीमांवर पिनाका प्रभावी ठरेल.