सततच्या घसरत्या विक्रीमुळे अडचणीत आलेल्या ओला इलेक्ट्रिकने आपल्या थर्ड जनरेशनच्या इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन रेंज बाजारात आणली आहे. याच्या बेस मॉडेलची किंमत 79,999 रुपयांपासून सुरू होते. याचे फ्लॅगशिप मॉडेल एका चार्जमध्ये 320 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल, असा कंपनीचा दावा आहे. याची टॉप स्पीड 141 किमी प्रतितास आहे, असा दावाही कंपनीने केला आहे. नवीन स्कूटर रेंज आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत खूपच चांगली सिद्ध होईल, असंही कंपनीचं म्हणणं आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
Ola S1 Gen 3 किंमत आणि व्हॅरिएंट (एक्स-शोरूम किंमत)
Ola S1X
2kWh: 79,999 रुपये
3kWh: 89,999 रुपये
4kWh: 99,999 रुपये
Ola S1X+
4kWh: 1,07,999 रुपये
Ola S1 Pro
3kWh:1,14,999 रुपये
4kWh: 1,34,999 रुपये
Ola S1 Pro+
4kWh:1,54,999 रुपये
5.3kWh: 1,69,999 रुपये
Gen-3 प्लॅटफॉर्मची स्कूटर लॉन्च करण्याबरोबरच कंपनीने तिची बुकिंगही सुरू केली आहे. ज्याची डिलिव्हरी फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरू होईल. Gen-2 आणि Gen-3 चे उत्पादन कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले आहे.
फीचर्स
ओलाने नवीन प्लॅटफॉर्मवर जनरेशन 3 इलेक्ट्रिक स्कूटर विकसित केली आहेत. नवीन रेंजसाठी ब्रेक बाय वायर तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले आहे. सुरक्षेसाठी या स्कूटरमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.