अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील अटक आरोपी आणि सीसीटीव्हीतील आरोपी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय प्रयोगशाळेतून एफएसएल अहवाल मुंबई पोलिसांना मिळाला आहे. या अहवालात सैफच्या घरात हल्ला करणारा आणि अटक केलेला आरोपी एकच असल्याचं रिपोर्टमधून निष्पन्न झालं आहे. सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद इस्लाम शरीफुल शहजादच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
अटक केलेला आरोपी आणि हल्ला करणारा आरोपी वेगळा असल्याच्या रंगल्या चर्चा होत्या. सैफच्या घरातून घेतलेले आरोपीचे फिंगर प्रिंट्स जुळले नाहीत. तसेच न्यायालयात आरोपीच्या वकिलांनीही सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी आणि अटक केलेला आरोपी वेगळे आहेत, असा दावा केला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपीची फेशियल रिकग्नेशन टेस्ट केली, ज्यात आरोपी तोच असल्याचं स्पष्ट झालं आहे.