पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी निवडणूक आयोगाची धाड, सी विजील अॅपवर पैसे वाटण्याचा आरोप;

ईडी आणि सीबीआयच्या आडून विरोधी पक्षातील नेत्यांना खोटय़ा आरोपांखाली जेलमध्ये पाठवणाऱया मोदी सरकारने आता निवडणूक आयोगालाही हाताशी धरले आहे. निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर सी विजील अॅपच्या माध्यमातून पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी आज त्यांच्या कपूरथला हाऊस येथे धाड टाकली. याठिकाणी बाहेर मोठय़ा संख्येने सुरक्षादलाचे जवान तैनात होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पथकाला बाहेरच रोखण्यात आले.

आमच्याकडे मान यांनी पैसे वाटल्याची तक्रार आली आहे. 100 मिनिटांत आम्हाला या तक्रारींचा निपटारा करायचा आहे. त्यासाठी आमचे भरारी पथक याठिकाणी आले होते. परंतु, आम्हाला मान यांच्या घरात घुसू दिले नाही. आम्हाला पॅमेरामॅनसोबत मान यांच्या घरात जाऊ द्यावे ही आपली विनंती रिटार्ंनग ऑफिसर ओपी पांडे यांनी केली.

भाजप नेत्यांवर कारवाई का नाही- मान

मान यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली असून प्रवेश वर्मा हे खुलेआम पैसे वाटत आहेत. तरीही निवडणूक आयोग काहीच करत नाही. त्यांना हे दिसत नाही का? असा सवाल आपचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला. वर्मा ट्विट करून कुठे पैसै वाटणार हे सांगतील. परंतु, भगवंत मान, अरविंद केजरीवाल आणि सौरभ भारद्वाज यांच्या घरावरच धाड पडते. दिल्ली पोलीस आणि निवडणूक आयोग भाजपाच्या इशाऱयावर पंजाबी लोकांना बदनाम करत आहेत, असा आरोप मान यांनी केला आहे.