Gold Rate Hike सोने 81 हजार पार

सोन्याने भाव खाल्ला असून पहिल्यांदाच सर्वकालीन उच्चांक गाठत 81 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 पॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 81 हजार 6 रुपये झाली आहे. बुधवारी हीच किंमत 80 हजार 975 रुपये प्रतिग्रॅम इतकी होती. दरम्यान, चांदीच्या दरातही वाढ झाली असून चांदीचे दर 920 रुपयांनी वाढून 91,600 रुपये किलो इतकी झाली आहे. याआधी चांदीचे दर 90,680 रुपये प्रतिकिलो होते.