व्हाईट हाऊसजवळ बुधवारी रात्री लष्कराच्या हेलिकॉप्टरला अमेरिकन एअरलाईन्सचे विमान धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 67 जणांचा मृत्यू झाला. धडक झाल्यानंतर हवेतच मोठा स्पह्ट झाला आणि आगीचे लोळ उडाले. या स्फोटाच्या आवाजाने अक्षरशः व्हाईट हाऊसही हादरले. कानठळय़ा बसवणाऱया या स्फोटानंतर विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत कोसळले. आतापर्यंत एका सैनिकासह 30 मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघातात कुणीही वाचलेले नसल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱयांनी दिली.
अपघातानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या घटना तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याचे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया अग्निशमन आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. लष्कराच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये 3 जण होते. दुर्घटनेनंतर अनेक नागरिकांनी विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क साधून अपघाताबद्दल विचारणा केली.
अपघातानंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. विमान आणि हेलिकॉप्टरचे अवशेष आणि मृतदेह नदीतून काढण्याचे प्रयत्न सुरू असून अपघातातून कुणी बचावले आहे का? याचाही शोध घेतला जात आहे.
ट्रम्प यांच्या मनात शंका
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या. विमान योग्य मार्गावर होते. हेलिकॉप्टर बराच काळ विमानाच्या दिशेने सरळ येत होते. विमानाचे दिवे लागलेले होते. तरीही हेलिकॉप्टर वर किंवा खाली का गेले नाही किंवा ते वळले का नाही? नियंत्रण कक्षाने हेलिकॉप्टरला का मार्गदर्शन केले नाही? असे विचारतानाच हा अपघात रोखता आला असता, असे ट्रम्प म्हणाले.
30 सेकंदांपूर्वी हेलिकॉप्टरशी संपर्क
विमान आणि हेलिकॉप्टरची धडक होण्याच्या अवघ्या 30 सेकंदांपूर्वी हवाई नियंत्रण कक्षाच्या नियंत्रकाने हेलिकॉप्टरच्या पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अवघ्या 30 सेकंदांत अपघात घडला. तुमच्या दृष्टिक्षेपात विमान आलेय का? अशी विचारणा नियंत्रकाने सैनिकांना केली होती. त्यानंतर काही क्षणांत नियंत्रकाने आणखी एक रेडिओ कॉल केला. परंतु, त्यावेळी लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमधून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.
एक मिनिटापूर्वी विमानाशी संपर्क
अपघाताच्या एक मिनिटापूर्वी विमान लॅण्ड होणार होते. हवाई नियंत्रण कक्षाने वैमानिकाशी संपर्क साधून विमान 33 क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरवता येईल का? असे विचारले होते. त्याला वैमानिकाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता, अशी माहिती समोर आली आहे.
विमानाचे तीन तुकडे
विमानाचे अक्षरशŠ तीन तुकडे झाले. ते नदीत सापडले, अशी माहिती वॉशिंग्टन डीसीचे फायर अँड ईएमएसचे प्रमुख जॉन डोनली यांनी दिली. आता आम्ही रिकव्हरी ऑपरेशन सुरू करत आहोत, असे डोनली म्हणाले.