
अभिनेता अल्लू अर्जूनचा मेगा ब्लॉकबास्टर चित्रपट पुष्पा-2 अखेर नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. पुष्पाने आतापर्यंत जगभरात 1800 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट 550 कोटी रुपयांचे होते. परंतु, या चित्रपटाने तिप्पट-चौपट कमाई केली आहे. सध्या पुष्पा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. आमीर खानचा दंगल हा पहिल्या स्थानावर आहे. या चित्रपटाने दोन हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, फहादा फासिल यांच्या भूमिका आहेत.