ईपीएफओने नियम बदलला, 3.9 लाख सदस्यांना फायदा होणार

epfo-pic

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने आपल्या सदस्यांना दिलासा देण्यासाठी एक नवीन नियम जारी केला आहे. अपडेशन प्रोसेस आणखी सोपी बनवण्यासाठी या नियमात बदल केला आहे. या निर्णयामुळे पेंडिंग रिक्वेस्ट असलेल्या 3.9 लाख सदस्यांना याचा लाभ मिळेल. या सदस्यांना आता पेंडिंग रिक्वेस्ट करणे आणि नवीन प्रोसेसअंतर्गत पुन्हा जमा करण्याची सुविधा मिळू शकणार आहे. या नव्या अपडेटमुळे सदस्य कोणतेही दस्तावेज जमा केल्याशिवाय आपली खासगी माहिती एडिट करू शकतील.