कारच्या धडकेने रिक्षाचालक ठार , चहाची तलफ जीवावर बेतली

चहाची तलफ एका रिक्षाचालकासाठी आज सकाळी काळ ठरली. नेहमीप्रमाणे दोन रिक्षाचालक सकाळी सहाच्या सुमारास जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा घेतल्यानंतर ते आपल्या रिक्षात बसले असतानाच सायन-पनवेल महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असलेली गाडी त्यांच्या दोन्ही रिक्षांवर जोरदार आदळली. यात घनश्याम जैस्वाल या रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला.

रिक्षाचालक घनश्याम जैस्वाल आणि राजेंद्र वनकळस यांना चहाची तलफ आली म्हणून ते चहा पिण्यासाठी आज सकाळी सहाच्या सुमारास जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ नेहमीप्रमाणे थांबले. हे दोघेही चहा पिऊन आपल्या रिक्षात बसले असता मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरून एक कार भरधाव आली. या कारचा चालक विष्णू राठोड याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे या कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षांना जोरदार धडक दिली. यात घनश्याम यांचा जागीच मृत्यू झाला.