शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

विद्यार्थ्यांमध्ये वृत्तपत्र वाचनाची आवड व मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघ (लोअर परळ विभाग) आणि डॉ. नीलेश मानकर यांच्या विशेष सहकार्याने राज्यस्तरीय ऑनलाईन शालेय मराठी वत्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत इयत्ता 2 री ते 9 वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.

‘विद्यार्थी आणि वर्तमानपत्र’, ‘वर्तमानपत्राच्या माध्यमातून मातृभाषा’, ‘स्वातंत्र्यलढय़ात वर्तमानपत्रांचे योगदान’, ‘वर्तमानपत्राचे सामाजिक महत्त्व’ असे वत्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत. यापैकी कोणत्याही एका विषयावर सादरीकरणाचा तीन मिनिटांचा व्हिडीओ 10 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा. स्पर्धकांनी नाव, पत्ता, जिल्हा आणि शाळेचे नाव नमूद करून विषय सादर करावा. स्पर्धेत मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांनी केले. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क – 7378977969, 9594085523 तसेच https://forms.gle/cGQYnvDeELAc9UTCA या लिंकवर क्लिक करून स्पर्धक सहभागी होऊ शकतात.