Saif Ali Khan Attack – आरोपी मोहम्मद शरीफुलची पोलीस कोठडी वाढवून देण्यास नकार

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम याने हल्ला करण्यापूर्वी रेकी केली होती. या प्रकरणात त्याला इतर कोणी मदत केली होती का हे तपासण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी आणखी वाढवून देण्याची मागणी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावत आरोपी शरीफुल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी मोहम्मद शरीफुल इस्लाम याला अटक केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज बुधवारी आरोपीला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी तपासासाठी कोठडीची मुदत आणखी तीन दिवस वाढवून द्यावी अशी मागणी केली. मात्र आरोपी दहा दिवसांपेक्षा जास्त पोलीस कोठडीत होता. पोलीस कोठडीसाठी कोणतेही नवीन कारण दिसून येत नाही किंबहुना तपासात काही नवीन आढळल्यास पोलीस भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या तरतुदीनुसार पोलीस कोठडीची मागणी करू शकतात असे न्यायालयाने स्पष्ट केले.

पोलिसांचा युक्तिवाद काय?

आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी खान यांच्या इमारतीची रेकी केली होती. या गुह्यात आरोपीला कोणी मदत केली का याचा तपास करण्यासाठी पोलिसांची एक तुकडी कोलकाता येथे असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. बांगलादेशातून हिंदुस्थानात बेकायदेशीरपणे येणाऱया आरोपीला कोणी मदत केली आणि आरोपीने बांगलादेशातील त्याच्या पुटुंबाला कोणाच्या माध्यमातून पैसे पाठवले याची चौकशी आवश्यक असल्याचा युक्ॊितवाद पोलिसांच्या वतीने करण्यात आला.