![france](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/france--696x447.jpg)
दिल्लीहून नेपाळला जाणाऱ्या दोन फ्रान्स नागरिकांना गुगल मॅपचा जबर फटका बसला. ब्रायन जॅक गिल्बर्ट आणि सेबॅस्टियन फ्रँकोइस गॅब्रिएल अशी फ्रेंच पर्यटकांची नाव आहेत. हे दोघेही सायकलवरून गुगल मॅपचा आधार घेत प्रवास करत होते. परंतु, गुगल मॅप मुळे ते थेट बरेलीतील धरणाच्या काठावर पोहोचले. रस्ता चुकल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. गावकऱ्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी या दोघांना पोलिसांकडे नेले. पोलिसांनी योग्य मार्ग दाखवत नेपाळला पाठवले. दोघे पिलीभीत हून टनकपूरमार्गे काठमांडूला सायकलने जात होते. दोघांनीही गुगल मॅप्सची मदत घेतली आणि प्रवासाला सुरुवात केली. गुगल मॅप्सच्या मदतीने जात असताना दोघेही अंधारात रस्ता चुकले आणि चुरैली धरणावर पोहोचले.