रुग्णालयातील डॉक्टर रिल्स बघण्यात मग्न, महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश

उत्तर प्रदेशातील मैनपुरी सरकारी रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्येच एका 60 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने महिलेचा जीव गेला. या महिलेच्या कुंटंबीयांनी डॉक्टर डुटीवर असलाना रील पाहत होते, असा आरोप केला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवेश कुमारी (60) असे त्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी अचानक प्रवेश कुमारी यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मैनपुरी सरकारी रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात आणण्यात आले. यावेळी डॉक्टर आदर्श संगर यांनी रुग्णाला स्वत: पाहण्याऐवजी नर्स आणि कंपाउंडरवर जबाबदारी सोपवली, अशी माहिती कुमारी यांच्या कुटुंबीयांनाी दिली. कुटुंबीयांनी वारंवार विनंती करूनही डॉक्टर खुर्चीवर बसून मोबाईल फोनवर रिल्स बघत होते.

दरम्यान, महिलेची तब्येत आणखी बिघडली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड सुरू केला. यामुळे रुग्णालयत एकच गोंधळ उडाला. “माझ्या आईच्या छातीत दुखत असल्यामुळे आम्ही तिला तातडीने इमर्जन्सी वॉर्डमध्ये स्ट्रेचरवर झोपवले. यावेळी डॉक्टर खुर्चीवर बसून मोबाईलमध्ये रिल्स बघण्यात मग्न होते. त्यांनी नर्सला माझ्या आईकडे पाहण्याची विनंती केली. मात्र, डॉक्टरांनी आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आमच्यात वाद झाला. यांच भांडणादरम्यान माझ्या आईची तब्येत आणखी बिघडली. तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले आणि तिचा मृत्यू झाला, अशी माहिती महिलेचा मुलगा गुरुशरण सिंग यांन दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. यामध्ये कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. यासंदर्भातील अहवाल आम्ही वरिष्ठांना पाठवला आहे, अशी माहिती डॉ. मदन लाल यांनी यांनी दिली.