Mahakumbh 2025: प्रयागराज येथे सुरू असलेला पवित्र कुंभमेळा दरम्यान चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती झाल्याने 30 ते 40 जण जखमी झाल्याचे तसेच 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभ मेळ्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चर्चा केली.
पंतप्रधानांनी तत्काळ मदत आणि भाविकांचा सुरक्षेबाबत सूचना केल्याचे कळते आहे. विशेष कार्यकारी अधिकारी आकांक्षा राणा यांच्या म्हणण्यानुसार बुधवारी पहाटे काही अडथळे तुटल्यानंतर “चेंगराचेंगरीसारखी”. परिस्थिती उद्भवली, ज्यामुळे काहीजण जखमी झाले. मात्र, जखमींची प्रकृती गंभीर नसल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळांनी दिलेल्या माहितीनुसार दहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
PM Modi has spoken to UP CM Yogi Adityanath second time in an hour. He is continuously monitoring the situation at Mahakumbh.
— ANI (@ANI) January 29, 2025
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना दिले आहे.
Union Home Minister Amit Shah speaks to Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath following a stampede-like situation at the Sangam during the Mauni Amavasya celebrations at the Mahakumbh Mela. He also assured him of full support from the Centre. pic.twitter.com/uqV5UeQFEZ
— ANI (@ANI) January 29, 2025