विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आधुनिक माहिती तंत्रज्ञान व जागतिक स्पर्धेत टिकून ठेवणारे ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ) लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अधिक गती देण्यासाठी एक विशेष कृती दल (टास्क पर्ह्स) स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, परेश पागे यांचा समावेश करण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार म्हणाले.