हिंदुस्थान अवकाशात आणखी एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रोची 100 वी ‘जीएसएलव्ही- एफ 15’ मोहीम बुधवार 29 जानेवारी रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली जाईल. 27 तासांचे काऊंटडाऊन पूर्ण केल्यानंतर रॉकेट उपग्रह घेऊन उड्डाण करेल.
इस्रोचे नवे अध्यक्ष व्ही नारायणन यांची ही पहिली मोहीम आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, स्वदेशी क्रायोजेनिक स्टेज असलेले ‘जीएसएलव्ही- एफ 15’ रॉकेट एनव्हीएस -02 उपग्रह भू-सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करेल. इस्रोने ‘एक्स’ या आपल्या सोशल मीडियाने हँडलवर माहिती दिली.