![court law order](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/12/court-law-order-696x447.jpg)
बार कौन्सिल ऑफ इंडियाने देशभरातील एलएलबीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नियमावली जारी केली. त्यानुसार एलएलबीच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेय. जर कुणी विद्यार्थी नोकरी करत असेल तर त्याला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्यावे लागेल. कॉलेजला याची माहिती बार कौन्सिल ऑफ इंडियाला द्यावी लागेल. विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि अन्य माहिती कॉलेजकडून बार कौन्सिल ऑफ इंडियाला दिल्यानंतरच मार्कशीट आणि डिग्री देण्यात येईल.
एलएलबी प्रवेशाच्यावेळी विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाईल. जर कुणा विद्यार्थ्याच्या नावे गुन्हेगारी रेकॉर्ड असेल तर त्याचे नामांकन होणार नाही. स्वतःच्या नावे कोणतीही गुन्हेगारी केस किंवा एफआयआर नसल्याचे शपथपत्र विद्यार्थ्याला द्यावे लागेल. जर कुणी विद्यार्थी दोषी आढळला तर त्याला त्याची बाजू बार कौन्सिलसमोर मांडावी लागेल.