शिवसेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालय आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना व भीमशक्ती संघटना यांच्या वतीने संविधानाच्या प्रतींचे पूजन करून भारतमातेला वंदन करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख प्रकाश रावळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, युवासेना जिल्हा युवा अधिकारी अवधूत पाटील, आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, विभागप्रमुख दिगंबर पाटील, उपशहरप्रमुख संदीप चव्हाण, सागर हेब्बाळे, रोहित डावरे, तेजस घेवडे, संभाजी येडुरकर उपस्थित होते.
दरम्यान, ‘देशातील भाजप सरकार वारंवार संविधान बदलण्याची भाषा करत आहे. ही बाब देशासाठी शोभनीय नसून, आम्ही हे कदापि सहन करणार नाही. जातीयवादी पक्षाचा हा डाव आम्ही उधळून लावू,’ असा इशारा कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिला.