शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी संविधानाचे पूजन करून सामुदायिक वाचन कार्यक्रम मोठ्या धडाक्यात पार पडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ईश्वरपूर येथे माजी नगरसेवक आणि उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय परिसरात संविधानाचे वाचन करण्यात आले.
प्रारंभी फटाक्यांची आतषबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. वाबासाहेव आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अॅड. धनाजी पाटील, अॅड. शिवाजी पाटील, रोहित वर्णे, विकास लाखे, फजल हवालदार, बाळासाहेब तांबे, अशोक चव्हाण, तात्यासाहेब बामणे, रामराव थोरात, जमीर नालबंद, राजू खान, विकास पाटील, संग्राम दमामे, पैगंबर संदे, साहिल तांबोळी, संदीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. आमच्या देशाचा इतिहास कुणी पुसत असेल, तर त्याला शिवसेना चोख उत्तर देईल, असा इशारा उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद यांनी दिला.