Rohit Pawar on Davos : खोटे आकडे फुगवून सांगण्याची गरज का? दावोस प्रकरणी रोहित पवार यांचा सवाल

मुख्यमंत्री दावोसला गेले पण त्यातील 67 टक्के करार हे महाराष्ट्रातील उद्योगांचे आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. तसेच गुंतवणुकीसंदर्भात खोटे आकडे फुगवून सांगण्याची गरज काय असा सवाल पवार यांनी विचारला आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, दावोस मध्ये 98% गुंतवणूकीचे करार परदेशी कंपन्यांनी केल्याची सरकारी वक्तव्ये बघून आश्चर्य वाटत नाही. कारण सरकारला रेटून खोटं बोलायची सवयच आहे, शिवाय आता तर ही सवय अधिक Pro version मध्ये Develop झालेली दिसते.

मुळात म्हणजे 61 MOU पैकी 45 MOU भारतातील कंपन्यांशीच झाले असून या कंपन्यांनी 11,02040 कोटीचे करार म्हणजेच 74 % गुतंवणूक आपल्या देशातील कंपन्यांनीच केली आहे. याहून विशेष म्हणजे देशातील कंपन्यांनी केलेल्या 45 MOU पैकी 36 MOU महाराष्ट्रातल्या कंपन्यानीच केले असून जवळपास 10,13642 कोटीची म्हणजेच 67 % गुंतवणुकीचे करार हे राज्यातीलच आहेत .

यामध्ये काही कंपन्या तर नरीमन पॉईंट भागातच आहेत. एका कंपनीने तर 3.05 लाख कोटीचा MOU व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केला. म्हणजे कंपनीचे प्रतिनिधी इकडे मुंबईत, मुख्यमंत्री तिकडे दावोसला असा मुंबई-दावोस दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सने करार केला गेला.

तसेच सरकार दावोसला जाऊन अपयशी ठरले असे नाही , परंतु खोटे आकडे फुगवून सांगण्याची गरज का पडते ? हा प्रश्न पडतो. देशातील आणि महाराष्ट्रातील कंपन्यांशीच करार केले जात असतील तर मग दावोस जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच Magnetic Maharashtra सारख्या कार्यक्रमावर भर द्यायला हरकत नसावी असेही रोहित पवार म्हणाले. .