आकाशात 1 हजार फूट विमानाचा थरथराट; 6 प्रवासी जखमी, इमर्जन्सी लँडिंग

नायजेरिया येथून वॉशिंग्टनला जाणारे नायटेड एअरलाइन्सचे विमान शुक्रवारी जोरदार धक्क्याने अचानक 1 हजार फूट हेलकावे खात आले. विमानाचा आकाशात थरथराट झाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांमध्ये भीती पसरली. विमानाच्या या जोरदार धक्क्यात चार प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स जखमी झाल्याची माहिती विमान प्रशासनाने दिली आहे.

विमानाला आपत्कालीन लँडिंगसाठी लागोस विमानतळावर परतावे लागले. फ्लाइटमध्ये 245 प्रवासी, 8 फ्लाइट अटेंडंट आणि 3 पायलट होते. फ्लाइटमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये विमानाच्या आत खाद्यपदार्थाच दे खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू पडताना दिसत आहेत.

विमान कंपनीने सांगितल्यानुसार, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नेमके कारण काय?

फ्लाइट अचानक खाली येण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. एअर टर्म्युलेन्समुळे ही घटना घडली नसल्याचे एअरलाइन्सने म्हटले आहे. अमेरिकन आणि नायजेरियन अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे त्याची चौकशी सुरू केली आहे. यूए 613 अचानक टेकऑफनंतर जवळपास 93 मिनिटांनी त्याच्या समुद्रपर्यटन उंचीच्या खाली घसरण्यास सुरुवात झाली. उड्डाण टेकऑफनंतर सुमारे 89 मिनिटांनी 1 हजार फूट वेगाने खाली उतरले.