महाकुंभमेळ्यात पुन्हा दुर्घटना, किला घाटावर भक्तांची बोट नदीत उलटली

आगीच्या घटनेनंतर प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात पुन्हा दुर्घटना घडली आहे. किला घाटावर भक्तांची बोट नदीत उलटली. बोटीत 10 जण होते. मात्र एनडीआरएफने तात्काळ सतर्कता दाखवत नदीतून सर्व भक्तांना सुखरुप बाहेर काढले.

बोटीतील सर्व भक्त किला घाटावरून बोटीने संगमावर स्नानासाठी चालले होते. मात्र किला घाटापासून काही अंतरावर गेल्यानंततर बोट अनियंत्रित झाली आणि पाण्यात उलटली. बोट उलटल्यानंतर भक्तांचा आरडाओरडा सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व भक्तांना सुखरुप वाचवले.