संविधान ही आपली ओळख- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज देशाला संबोधित केले. संविधानाचे महत्त्व, ते अंतराळ संशोधन, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील हिंदुस्थानच्या यशावर राष्ट्रपतींनी प्रकाश टाकला. संविधान ही आपली ओळख आहे. ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ यामुळे प्रशासनातील सातत्य वाढेल आणि आर्थिक भार कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

क्रीडा क्षेत्रातील देशाच्या उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक करताना मुर्मू यांनी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमधील कामगिरीवरून खेळाडूंची प्रशंसा केली. आजच्या घडीला आपला देश आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत आहे. ज्यांनी आपल्या भूमीला परकीय सत्तेच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी बलिदान दिले अशा शूरवीरांचे स्मरण केले पाहिजे. संविधान ही आपली ओळख असून हे आपल्याला एक कुटुंब म्हणून एकत्र बांधते, असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले.