ममता कुलकर्णी बनली संन्यासी

अभिनेत्री  ममता कुलकर्णी हिने महाकुंभमध्ये संन्यास घेतला आहे. महाकुंभमधील किन्नर आखाडय़ामध्ये संन्यासाची दीक्षा घेतली असून ममता आता महामंडलेश्वर बनली आहे. ममताने यावेळी संपूर्ण रितीरिवाजाप्रमाणे कर्मकांड केले. संगम नदीत पिंडदान केले. त्यानंतर ममताला दुधाने अंघोळ घातली. मंत्रोच्चारात अभिषेक करून तिला महामंडलेश्वर घोषित केले. त्यामुळे आता श्री यामाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाणार आहे. अभिषेक केल्यानंतर ममता भावूक झाल्याचे दिसले.