Video- लोकांची फसवणूक करून हे सरकार आलंय, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

विधानसभा निवडणुकीआधी आणलेल्या लाडकी बहीण योजनेला महायुती सरकारकडून निकषांची कात्री लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनेक बहिणी अपात्र ठरणार आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडालाही पाने पुसली जात आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफीचे जाहीर आश्वासन देणारे सरकार आता यामुळे तिजोरीवर भार पडू शकतो अशी पळवाट काढताना दिसत आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.