चेक बाऊन्समुळे मिळाली तुरुंगवासाची शिक्षा? अभिनेत्याला एक चूक पडली महागात

बॉलीवूडचे चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना चेक बाऊन्स प्रकरणी 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध चेक बाऊन्स झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एका चित्रपटासाठी पैसे देण्यासाठी चेक जारी केला होता, परंतु त्या चेकमधील रकमेसाठी त्याच्या खात्यात पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे तो चेक बाऊन्स झाला. त्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

चेक बाऊन्स प्रकरणी कोणती शिक्षा दिली जाते?

मिळालेल्या माहितीनुसार, चेक बाऊन्स झाल्यावर कमीत कमी 3 वर्षांचा तुरूंगवास होऊ शकतो. तसेच तीन वर्षांच्या तुरूंगवासासह दंड देखील भरावा लागू शकतो. जर या प्रकरणीतल आरोपीने मिळालेली शिक्षा भोगली नाही, तर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाते. यानंतर न्यायालयात खटला चालवला जातो. दरम्यान न्यायालयातून या प्रकरणाची चौकशी देखील केली जाते.

दरम्यान, आरोपी न्यायालयात हजर न झाल्यास जामीनपात्र वॉरंट जारी केले जाते. असे असूनही आरोपी न आल्यास अटक वॉरंट जारी केले जाते.