टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याचा गेल्यावर्षी घटस्फोट झाला. गेल्या काही दिवसांपासून फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या काडीमोडाची चर्चा सुरू आहे. चहलची चर्चा सुरू असताना टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज म्हणून नाव कमावलेला विरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत यांच्यातही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. सेहवाग आणि आरती यांचा डावही अर्ध्यावरती मोडण्याच्या वाटेवर असून दोघेही 20 वर्षाच्या संसारानंतर वेगळे होणार (Virender Sehwag Aarti Ahlawat divorce news) आहेत.
वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचा 20 वर्षाचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. दोघांनीही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून एकमेकांना अनफॉलोही केले आहे. दोघेही बऱ्याच काळापासून वेगवेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार आहेत, अशी माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिल्याचे वृत्त वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिले आहे.
आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांनी 2004 मध्ये विवाह बंधनात अडकले होते. दोघांना आर्यवीर आणि वेदांत अशी दोन मुलं आहेत. मात्र दोघांमध्ये गेल्या काही काळापासून सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे.
दिवाळीच्या दरम्यान सेहवागने दोन्ही मुलांसह आईसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यात आरती कुठेही दिसली नव्हती. तसेच त्याने आपल्या पोस्टमध्येही तिचा उल्लेख केला नव्हता. तेव्हाच सेहवागच्या घटस्फोटाची कुणकुण चाहत्यांना लागली होती. आता आता त्यात तथ्य असल्याचे समोर येत आहे.
घरच्यांचा राडा अन् प्रेमविवाह
वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचा प्रेमविवार आहे. दोघांच्या प्रेमविवाहाला आधी घरच्यांची संमती नव्हती. दोघांच्या कुटुंबीय दुरचे नातेवाईक होते. पण वीरू आणि आरती एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी कुटुंबीयांशी समजूत काढून लग्नही उरकून घेतले. पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावल्यानंतर वीरूच्या लग्नाचा बार उडवण्यात आला होता.