मनरेगाच्या कामगारांना घेऊन जाणारे वाहन उलटले, 25 हून अधिक जण जखमी

मनरेगाच्या कामगारांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याने 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हुक्केरी तालुक्यातील होसूर गावाजवळील राज्य महामार्गावर हा अपघात झाला. मोटारसायकलला धडक टाळताना वाहनाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी कामगारांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.