मुंबईत 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार, आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांकडून अटक

मुंबईतील राम मंदिर स्टेशन परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून मग सिझेरियन ब्लेड आणि दगडाने हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. राज रतन वालवल असे अटक आरोपीचे नाव आहे.

पीडित तरुणी राम मंदिर स्टेशन परिसरात बेशुद्धावस्थेत आढळून आली. वनराई पोलिसांनी तिला केईएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पीडितेच्या गुप्तांगातून सिझेरियन ब्लेड आणि दगड काढले. पीडिता आई-वडिलांसोबत नालासोपारा येथे राहत असल्याची माहिती मिळते. वनराई पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.