भरधाव इनोव्हा कार व्हॅनला धडक देत ट्रकखाली घुसून झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात सात जण जखमी झाले. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये चिनहाट येथील देवा रोडवर गुरुवारी रात्री ही घटना घडली. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. किरण यादव, कुंदन यादव, बंटी यादव आणि शोभित यादव अशी मयतांची नावे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत चौघेजण रुग्णालयातून घरी परतत असताना मागून येणाऱ्या इनोव्हा कारने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. यानंतर इनोव्हा ट्रकखाली घुसली. या अपघातात इनोव्हाचा चक्काचूर झाला.