एक देश, एक निवडणुकीशी संबंधित दोन विधेयकांवर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची दुसरी बैठक 31 जानेवारीला होणार आहे. नवी दिल्लीतील संसद एनेक्सी भवनच्या मुख्य समिती कक्षात दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. पहिली बैठक 8 जानेवारीला झाली होती. या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली होती. संयुक्त संसदीय समितीत 39 सदस्य आहेत. बैठकीत निवडणुकीत होणा ऱ्या खर्चाबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.