दहशतवादी चकमकीत अग्निवीर शहीद

जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पंजाबमधील मानसा जिह्यातील अग्निवीर जवान लवप्रीत सिंग (24) शहीद झाला. दोन वर्षांपूर्वी तो अग्निवीर योजनेच्या माध्यमातून सैन्यात भरती झाला होता. काही दिवसांनी तो लग्नाच्या कार्यक्रमासाठी रजेवर येणार होता. त्याची सुट्टी मंजूर झाली होती, असे कुटुंबीयांनी सांगितले. लवप्रीत दोन भावंडांमध्ये धाकटा होता. दोन दिवसांपूर्वीच त्याचा आईसोबत संवाद झाला होता.