अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. याप्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व सत्य जनतेसमोर मांडावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबईतील सुरक्षित समजल्या जाणा ऱ्या वांद्रे भागात अभिनेत्याच्या घरात हल्ला झाल्याने सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत तसेच गावातील सरपंचही सुरक्षित नाहीत तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? हा कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असून निवृत्त पोलीस अधिका ऱ्यांना महत्त्वाच्या पदावर बसवून सरकार काम करत आहे त्याचासुद्धा हा परिणाम आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलीवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सैफ हल्ला प्रकरणात जी व्यक्ती पकडण्यात आली त्याबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात पोलिसांनीच खुलासा करावा, असे पटोले म्हणाले.