टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण, ईडीचे मुंबई व जयपूरमध्ये छापे

टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात आता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीने गुरुवारी 13 ठिकाणी छापेमारी केली. त्यात मुंबईतील 10 व जयपूर येथील तीन ठिकाणांचा समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीने 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय असून त्याचा ईडी तपास करीत आहे.

टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौघांना अटक करून कोटय़वधींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात रोकड व सोने-चांदीचा समावेश आहे, मात्र या गुह्यातील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाही. आठ युव्रेनचे, एक तुकाaचा तसेच मुंबईतला तौसिफ रियाज हे पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत. दरम्यान, या प्रकरणात ईडीने गुरुवारी सकाळपासूनच मुंबईतील 10 ठिकाणी छापे मारले. याशिवाय जयपूर येथील तीन ठिकाणीदेखील झाडाझडती घेतली. टोरेस प्रकरणातील गुंतवणूकदारांना देण्यात येणारे खडे जयपूर येथून घेण्यात आले होते. त्यामुळे तेथे छापे टाकण्यात आले. याशिवाय मुंबईतील टोरेससंबंधी ठिकाणांवर ईडीने छापे टाकले.