लक्षवेधी – देशभरातून महत्त्वाच्या बातम्या

ओयो देशभरात  500 हॉटेल उघडणार

ओयो देशभरात आणखी 500 हॉटेल उघडण्याच्या तयारीत आहे. कंपनी देशातील प्रमुख आणि धार्मिक स्थळांवर हे हॉटेल्स उघडणार आहे. या नव्या हॉटेलमुळे भाविकांना राहण्याची चांगली सुविधा मिळू शकेल.

 1700 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

अ‍ॅमेझॉनने पुढील दोन महिन्यात कॅनडातील क्युबेकमधील सर्व सात गोदाम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅमेझॉनच्या या निर्णयामुळे जवळपास 1700 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे.

वाघनखांचे लॉकेट घालणे पडले महागात

तामीळनाडूमधील कोईम्बतूर येथील एका व्यावसायिकाला गळय़ात वाघनखांचे लॉकेट घालणे चांगलेच महागात पडले. बालाकृष्णन असे या व्यावसायिकाचे नाव आहे. बालाकृष्णन यांनी एका मुलाखतीवेळी गळय़ात वाघनखे असल्याचा दावा केला होता.