मोनालिसा भोसलेचा मेकओव्हर, ओळखणेही झाले अवघड़

महाकुंभमेळ्यात आपल्या सौंदर्यामुळे अनेकांना भुरळ पाडणाऱ्या मोनालिसा भोसलेचा मेकओव्हर करण्यात आला. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या मोनालिसाला ब्यूटी पार्लरमध्ये नेण्यात आले. पार्लरमध्ये मेकओव्हर केल्यानंतर मोनालिसाला ओळखणेही अवघड झाले आहे. मोनालिसा आता आणखी सुंदर दिसत असून अनेकांनी तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. मोनालिसा ही मूळची मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे. शिप्रा मेकओव्हर ब्यूटी सलूनने मोनालिसा हिचा मेकओव्हर केला आहे. ब्यूटी सलूनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मोनालिसाचा मेकओव्हर शेअर करण्यात आला आहे. मोनालिसाच्या या व्हिडीओला लाखो ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत.