सॅमसंगने अखेर आपली फ्लॅगशीप गॅलेक्सी एस25 सीरीजवरून पडदा हटवला आहे. या सीरीज अंतर्गत सॅमसंगने गॅलेक्सी एस 25 आणि गॅलेक्सी एस 25 प्लस हे दोन स्मार्टफोन आणि गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा स्मार्टफोन लाँच केले. सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्राच्या 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 1 लाख 12 हजार 300 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम प्लस 512 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 1 लाख 43 हजार 400 रुपये आहे. या फोनला चार कलरमध्ये लाँच केले आहे. फोन मध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे.