पर्यटन आणि एआय

‘एआय’च्या झपाट्यामुळे आज अनेक क्षेत्रांमध्ये मोठा कायापालटही होत आहे आणि परिवर्तनही घडत आहे. पर्यटनाचे क्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही. पर्यटक हा पर्यटन व्यवसायाचा कणा आहे. पर्यटकांची पसंती, त्यांचे प्राधान्यक्रम, आर्थिक स्थिती, बदलती अभिरुची, पर्यटनाबाबतचे त्यांचे फिडबॅक यांसारख्या असंख्य प्रकारच्या माहितीचा समावेश असणाऱ्या डेटाचे विश्लेषण एआय लीलया करू शकत असल्यामुळे सहली अधिकाधिक टुरिस्ट फ्रेंडली बनवण्यास आणि पर्यटकांना मिळणारा सहलीचा आनंद वृद्धिंगत होण्यास मोठी मदत होईल.

त्रिम बुद्धिमत्ता जगभरातील २२ उद्योगांमध्ये क्रांती घडवत आहे व पर्यटनही त्याला अपवाद नाही. पर्यटन क्षेत्र नवीन तंत्रज्ञानाच्या ट्रेंडशी जुळवून घेत असल्याने ग्राहकांचे अनुभव वाढविण्यासाठी, पर्यटन मोहिमा सुव्यवस्थित करण्यासाठी आणि अत्यंत वैयक्तिकृत सेवा प्रदान करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक शक्तिशाली साधन म्हणून उदयास आले आहे. किंबहुना येणाऱ्या काळात पर्यटनाच्या सतत विकसित होत असलेल्या लैंडस्केपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता गेमचेंजर बनू शकते, असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. वैयक्तिकृत (पर्सनलाईज्ड) शिफारसींपासून अखंडित बुकिंग सेवा प्रदान करण्यापर्यंत एआय ट्रॅव्हल एजंट पर्यटकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहताना दिसत आहेत. ट्रॅव्हल इंडस्ट्री डिजिटल युगाशी जुळवून घेत असताना है बुद्धिमान साथीदार केवळ प्रक्रिया सुव्यवस्थित करत नाहीयेत, तर या व्यवसायाचा कणा असणाऱ्या पर्यटकांचे, ग्राहकांचे समाधानदेखील वाढवताहेत.

एआयचे अल्गोरिदम प्राधान्यक्रमाच्या आणि रिअल-टाइम डेटाच्या आधारावर प्रत्येक प्रवाशासाठी अनुकूल प्रवास पर्याय सुचवण्यासाठी डेटाचे विश्लेषण करतात. एआय-चालित कॅप्टन नीलेश गायकवाड चॅटबॉट्स 24/7 साहाय्य प्रदान करतात. नैसर्गिक भाषेतील संभाषणांमुळे ग्राहकांना विलक्षण संवादानुभूती मिळत आहे. एआयकडून संचलित होणारी विविध साधने ट्रैफिक आणि हवामान यांसारख्या घटकांचा विचार करून, वेळेची कार्यक्षमता वाढवून इष्टतम प्रवास मार्ग तयार करून देण्यात मोठी भूमिका बजावत आहेत.

मुळातच या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य अफाट निरीक्षण आणि त्याद्वारे विश्लेषण करणे हे आहे. त्यामुळे के ए एआय प्रवाशांमध्ये असणाऱ्या ट्रेंडचा अचूक अंदाज लावण्यात मोठी भूमिका बजावत आहे. यामुळे व्यवसायांना आपली धोरणे अधिकाधिक प्रवासीस्नेही करणे शक्य होत आहे. सहलीच्या एकूण खर्चाबाबत वाढलेल्या स्पर्धात्मकतेमध्ये एआयचे विश्लेषण ट्रॅव्हल कंपन्यांना किफायतशीर दरामध्ये सहलींची आखणी करण्यात मोलाचे योगदान देत आहे. एआयने सर्वांत मोठे काम केले आहे ते म्हणजे प्रवाशांना येणारा भाषेचा अडसर दूर केला आहे. प्रवासादरम्यान अखंड संवादासाठी आता भाषेविषयीचे अज्ञान हा मुद्दा गौण ठरत जाणार आहे. कारण एआय कोणत्याही प्रकारच्या माहितीचा एकाहून अधिक भाषांमध्ये अनुवाद करण्यास सक्षम असल्यामुळे प्रवाशांसाठी आपल्या भाषिक सीमा ओलांडून अन्य प्रदेशात गेल्यानंतर अडचणी येत नाहीत. एआयलिखित वाक्ये त्वरित आपल्या भाषेत अनुवादित करत असल्याने विदेशातील बाजारपेठेत किमतीसाठी वाटाघाटी करण्यासह अनेक गोष्टीविषयीची माहिती नेमकेपणाने घेऊ शकतात.

पर्यटकांकडून मिळणारा फिडबॅक ही कोणत्याही दूर व्यावसायिकाची शिदोरी असते. एआयद्वारे या फिडबॅकचे वर्गीकरण आणि विश्लेषण आयत्या स्वरूपात उपलब्ध होऊ शकते. त्याचा वापर करून ट्रॅव्हल कंपन्या आपल्या कार्यपद्धतीतील उणिवा, कमतरता दूर करून त्या अधिकाधिक टुरिस्ट फ्रेंडली बनवू शकतात.

ट्रॅव्हल कंपन्यांसाठी फ्लाईट बुकिंग हे मोठे आव्हान असते. किमतींमधील चढउतारांचा सामना करत त्याला किफायतशीर दरात विमान सेवांचे आगाऊ बुकिंग करावे लागते. यामध्ये एआय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. एआय एजंट ऐतिहासिक डेटा, सध्याची मागणी आणि इष्टतम बुकिंग वेळेचा अंदाज घेण्यासाठी बाजारातील ट्रेंडचे विश्लेषण करतात.

• पर्यटन हा सेवा क्षेत्रातील व्यवसाय आहे. अगत्यशीलता हा या सेवेचा पाया आहे. यामध्ये भावनांना मोठे स्थान आहे. त्यामुळे एआयचा वापर ट्रॅव्हल कंपन्यांना डेटा अॅनालिसिसच्या दृष्टीने निश्चितपणाने चांगला होऊ शकेल. परंतु ज्या गोष्टी भावनांशी संबंधित आहेत तिथे एआय, बॉटस्, रोबोट यांच्यापेक्षा पर्यटकांना सहलीदरम्यान निर्भेळ आनंद मिळावा यासाठी प्रशिक्षण घेतलेले टूर ऑपरेटरच प्रभावी ठरतील यात शंका नाही.

कुंभमेळ्यात एआय

आज ट्रॅव्हल कंपन्यांकडूनही आध्यात्मिक सहलींचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते.
• उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू झालेला महाकुंभमेळा हा आध्यात्मिक पर्यटनाचा नावलौकिक वाढवणारा आहे. या कुंभमेळ्याच्या आयोजनामध्ये डिजिटलायजेशन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. विशेषतः आज ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी जगभर चर्चा होत आहे, त्या एआयचे अनेकविध वापर हा भक्ती सोहळा सुरळीतपणाने, सुलभपणाने आणि सुखकरतेने पार पाडावा यासाठी करण्यात येत आहे.
• कुंभमेळ्यात ताटातूट झालेल्यांची लवकर भेट होत नाही, हे आपण बॉलीवूडच्या अनेक सिनेमांमध्ये पाहिलं आहे. पण प्रयागराजमधील महाकुंभमध्ये तसं होणार नाही, कारण कुंभमेळ्यात हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आता एआयची मदत घेतली जाणार आहे.
• महाकुंभ 2025 साठी संगणकीकृत हरवले-सापडले केंद्र सुरू केले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून भाविकांची मदत केली जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून लोकांचे फोटो काढणे, बेटा एकत्र करणे आणि त्या डेटाचा वापर करणे ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. हरवलेल्या व्यक्तींबाबत पोलीस विभागाकडून स्केचिंग केले जाते. आता या स्केचिंगसाठी एआयचा वापर केला जाणार असून लौकांना शोधण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
केवळ कुंभमेळाच नव्हे तर विविध पर्यटनस्थळांवर, धार्मिक स्थळांवर, तीर्थक्षेत्रांवर गर्दी व्यवस्थापनासाठी एआय प्रभावी ठरू शकेल आणि त्यातून तेथे येणाऱ्या पर्यटकांना, भाविकांना आनंददायी पर्यटनाचा अनुभव घेता येऊ शकेल.

(लेखक ज्येष्ठ पर्यटन व्यवसायिक आहेत.)