चॅटबॉटचा खोटेपणा आणि एअर कॅनडाला दंडाचा फटका

>> प्रसाद ताम्हणकर

नोव्हेंबर 2023 मध्ये जॅक मोफॅट या व्यक्तीच्या आजीचे निधन झाले. त्यामुळे तातडीच्या प्रवासासाठी जॅकने एअर कॅनडाशी संपर्क साधला. त्याला तो काढणार असलेल्या प्रवासी तिकिटावर किती Bereavement Fares मिळू शकेल याची माहिती घ्यायची होती. एखाद्या व्यक्तीला अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे प्रवास करावा लागल्यास, काही हवाई कंपन्या त्याला प्रवासी दरात सवलत देत असतात. त्यालाच Bereavement Fares म्हणतात. एअर कॅनडा तर्फे प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीच्या ऐवजी वर्चुअल असिस्टंट अर्थात चॅटबॉटने जंकशी संवाद साधला. या चॅटबॉटने त्याला Vancouver à Toronto या प्रवासाचे नेहमीच्या द्राचे तिकीट काढण्याचा आणि Bereavement Fares सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी पुढच्या 90 दिवसांत अर्ज करण्याचा सल्ला दिला.

मिळालेल्या सल्ल्याला अनुसरून जॅकने CA$794.98 (साधारण 47 हजार रुपये) चे Toronto पर्यंतचे आणि CA$845.38 (साधारण 51 हजार रुपये) चे Vancouver च्या परतीच्या प्रवासाचे तिकीट बुक केले. मात्र परतल्यावर जेव्हा जॅकने सवलतीसाठी अर्ज केला, तेव्हा कंपनीने तो सपशेल नाकारला. एकदा तिकीट खरेदी केल्यानंतर अशी सवलत मागता येत नाही, ती आधी मागावी लागते, असे कंपनीने जॅकला कळवले आणि हात वर केले. संतापलेल्या जॅकने आता एअर कॅनडाला कोर्टात खेचले. एअर कॅनडा आपल्या बॅटबॉटतर्फे लोकांमध्ये चुकीची आणि गैरसमज पसरवणारी माहिती प्रसारित करत आहे, असा त्याचा आरोप होता.

चॅटबॉटसारख्या व्हच्र्युअल असिस्टंट यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीची जबाबदारी घेण्यास एअर कॅनडाने ठाम नकार दिला. मात्र न्यायाधीश ख्रिस्तोफर रिव्हर्स हे मोठे हुशार आणि खमके गृहस्थ निघाले. त्यांनी एअर कॅनडाला चांगलेथ खडसावले आणि कंपनीचा व्हर्चुअल असिस्टंट असलेल्या चॅटबॉटद्वारे प्रवाशांना दिली जाणारी माहिती ही अचूक असेल याची जबाबदारी कंपनीची असल्याचे सुनावले. कोर्टाने एअर कॅनडाला जॅकला CAS 812.02 इतकी रक्कम परत करण्यास सांगितले. तसेच इतर नुकसान भरपाई म्हणून वेगळे CAS 650.88 देण्याचे देखील आदेश दिले