दिल्ली गुंडगिरी सहन करणार नाही, केजरीवाल यांचा अमित शहांना इशारा

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप आणि टीका टिप्पणी सुरू आहे. अशातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. अमित शहाजी, तुम्ही गुजरातमध्ये गुंडगिरी केली असेल पण दिल्ली तुमची गुंडगिरी सहन करणार नाही, असा इशाराच केजरीवाल यांनी दिला.

अरविंद केजरीवाल यांनी आपले सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी लिहिले आहे की, ‘अमित शाह जी पूर्णपणे घाबरले आहेत. अमित जी, तुम्ही गुजरातमध्ये गुंडगिरी केली असेल, पण दिल्ली तुमची गुंडगिरी सहन करणार नाही’. इतकेच नाही तर आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह हेही भाजपवर जोरदार आरोप करताना दिसले. त्यांनीएक्सवर पोस्ट करून लिहिले की, भाजप निवडणुका वाईटपद्धतीने हरत आहे. पराभवाच्या भीतीने पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. नवी दिल्ली विधानसभेचे बी.दिल्ली पोलीस नियम आणि कायदे धुडकावून लावत आर कॅम्पमधील आप कार्यकर्ता बंटी शेखावत यांच्या घरावर छापा टाकत आहेत. निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्तांनी या घटनेची दखल घ्यावी, असेही त्यात म्हटले आहे.

दिल्ली विधानसभेची निवडणूक 5 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात होणार आहे. त्याचा निकाल 8 फेब्रुवारी रोजी जनतेला कळणार आहे. दिल्लीत गेल्या 15 वर्षांपासून आम आदमी पक्षाची सत्ता असून 2015 आणि 2020 मध्ये ‘आप’ने 70 पैकी 67 आणि 62 जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी ही स्पर्धा खूपच चुरशीची होणार आहे.