>> उज्ज्वल निरगुडकर
चित्रपट निर्मितीतील काही टप्प्यांसाठी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो व त्यामुळे चित्रपट निर्मिती प्रक्रियेत वेळेची व खर्चाची बचत करू शकतो. अर्थात त्यातील काही टप्पे म्हणजेच स्क्रिप्ट लिहिणे, छायाचित्रण यासाठी मानवी बुद्धीचा तसेच मानवी निर्णयक्षमतेचा वापर करावाच लागेल. पूर्वीच्या काळीसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेला होता, पण त्या तंत्रज्ञानाला तेव्हा ‘स्पेशल इफेक्ट्स’ किंवा ‘कॉम्प्युटर ग्राफिक्स’ असे म्हणत.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चित्रपटसृष्टीसाठी नेमका Ce कसा होईल यावर हल्ली बऱ्याच चर्चा संपूर्ण जागतिक चित्रपटसृष्टीत होताना दिसतात. एखादा चित्रपट बनण्यासाठी व तो चित्रपट प्रदर्शित करण्यासाठीची प्रक्रिया बऱ्याच टप्यांत घडते. यातील काही प्रमुख टप्पे म्हणजे
1. स्क्रिप्ट लिहिणे 2. भूमिकांसाठी पात्रांची निवड (नट, नट्या) 3. सीन्सचे विभाजन (वेगवेगळे सीन कुठे आणि कोणावर चित्रित होणार याविषयी नियोजन) 4. छायाचित्रण 5. संकलन (एडिटिंग) 6. पोस्ट प्रॉडक्शन 7. कलर ग्रेडिंग 8. सेन्सॉर 9. मार्केटिंग 10. प्रदर्शन (सिनेमागृहात अथवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर
यातील काही टप्प्यांसाठी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो व त्यामुळे चित्रपट निर्मिती प्रक्रियेत वेळेची व खर्चाची बचत करू शकतो. अर्थात त्यातील काही टप्पे म्हणजेच स्क्रिप्ट लिहिणे, छायाचित्रण यासाठी मानवी बुद्धीचा तसेच मानवी निर्णयक्षमतेचा वापर करावाच लागेल. चित्रपटाचे प्लॅनिंग करण्यासाठी जर आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास ती प्रक्रिया सुलभ होऊ शकेल. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या सीनसाठी कुठले नट किंवा नट्या लागणार आहेत याची माहिती आधीच जर संगणकाला दिली तर या सीनचे प्लॅनिंग एआय वापरून करता येईल, ज्यामुळे नटनट्यांचा वेळ वाचेल आणि चित्रपटाच्या खर्चातही बचत होईल.
वेगवेगळे सीन कुठल्या ठिकाणी आणि कुठल्या वेळेला चित्रित करायचे आहेत, याची माहिती संगणकाला दिली तर नेमका कुठला सीन दिवसा करायचा आहे, कुठला रात्री करायचा आहे याचे प्लॅनिंग केल्यास चित्रीकरणाचे एकंदर दिवस कमी होतील व खर्चातही बचत होईल. पूर्वीच्या काळीसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेला होता, पण त्या तंत्रज्ञानाला तेव्हा ‘स्पेशल इफेक्ट्स’ किंवा ‘कॉम्प्युटर ग्राफिक्स’ असे म्हणत. याचा वापर बऱ्याच भारतीय चित्रपटांसाठीसुद्धा झालाय. काही वर्षांपूर्वी आलेल्या हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कोई मिल गया’ या हिंदी चित्रपटात वापरले गेलेले ‘जादू’ हे त्याचे उदाहरण आहे.
हल्लीच्या पिढीला माहीत असलेले उदाहरण म्हणजे ‘बाहुबली’ हा चित्रपट. या चित्रपटात दाखविले गेलेले हत्ती, घोडे हे प्राणी अगदी खरे आहेत असे वाटते. कॉम्प्युटरने निर्माण केलेल्या प्रतिमांचा वापर करून हे साध्य झाले आहे.
चित्रपटाच्या लेखक आणि दिग्दर्शकांनी कल्पिलेल्या अनेक दृश्यांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ‘झपाटलेला’ या मराठी चित्रपटातसुद्धा निर्माता, दिग्दर्शक महेश कोठारेंनी ‘तात्या विंचू’ हे पात्र याच पद्धतीने दाखविले आहे. पूर्वी चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी बरेच वाद्यवादक लागत, पण कालांतराने प्रचलित झालेले Synthesizer या इलेक्ट्रॉनिक वाद्यातून वेगवेगळी वाद्ये वाजविली जातात. हासुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचाच एक प्रयोग म्हणावा लागेल. थोडक्यात काय तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात आहे. फक्त तिचा बोलबाला हल्ली जास्त झाला आहे.
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमान यांनी नुकताच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक नवा प्रयोग केलाय. त्यांनी दिवंगत गायक Bamba Bakya आणि Shahul Hamid यांचा उपलब्ध आवाज वापरून रजनीकांत यांच्या नव्या ‘लाल सलाम’ या चित्रपटासाठी एक गीत ध्वनिमुद्रित केले आहे. हॉलीवूडच्याही एका आगामी ‘E’ या चित्रपटासाठी जपानी शास्त्रज्ञांनी निर्माण केलेली ‘ERICA ही रोबो अभिनेत्री चित्रपटासाठी नायिकेची प्रमुख भूमिका करत आहे. या सिनेमाचे बजेट सुमारे ५०० कोटी असून या सिनेमाचे ट्रेलर्ससुद्धा यूट्यूबवर आता उपलब्ध आहेत. हा चित्रपट निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला तर चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात एक क्रांतीच होणार आहे.
याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कृष्णधवल चित्रपट रंगीत करण्यासाठीही करतात. त्या काळी फक्त कृष्णधवल फिल्म उपलब्ध असल्यामुळे त्यात वापरलेल्या रंगीत कपड्यांचे चित्रण फिल्मवर काळ्या, पांढऱ्या तसेच वेगवेगळ्या करड्या रंगाच्या (ग्रे शेडस्) छटांमध्ये होत असते. जर मूळ कपड्याचा रंग लाल असेल तर त्याची करडी छटा वेगळी असते. मूळ रंग निळा असेल तर त्याची करडी छटा वेगवेगळी असते. या करड्या रंगाच्या छटांचे सॉफ्टवेअरमार्फत पृथक्करण करून मुळ रंग कोणता होता याचा नक्की अंदाज लागतो आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृष्णधवल चित्रपट रंगीत केला जातो. उज्ज्वल निरगुडकर मानवी मेंदूमध्ये विचार करण्याची एक वेगळीच क्षमता असते व त्याद्वारे आपण वेगवेगळ्या सत्य आणि कल्पित घटनांविषयी लिहू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरानेसुद्धा असे लेखन करता येईल काय? याचा सध्या प्रयत्न होताना दिसत आहे. अर्थात त्याचे स्वामित्व अधिकार नेमके कोणाचे? यावरची भूमिका अजून तरी स्पष्ट झालेली नाही. त्यामुळेच सध्या तरी अशा लेखनाला पारितोषिके न देण्याचा निर्णय ऑस्करसकट इतरही फिल्म फेस्टिव्हल्सनी घेतला आहे.
आपण बऱ्याच वेळा असं पाहिलं आहे हे नव्या युगातल्या तंत्रज्ञानाचा उल्लेख प्रथम एखाद्या चित्रपटात आपल्याला आढळतो आणि त्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात शोध नंतर लागतो. चित्रपट हे असं प्रभावी माध्यम आहे की, त्यात नवनवीन कल्पना आणि शोध हे त्यांच्या जन्माच्या खूप आधीच लेखकाने मांडलेल्या आहेत. याच एक उत्तम उदाहरण म्हणजे २ एप्रिल १९६८ ला प्रदर्शित झालेला ‘2001 Space ओडिसी’ हा हॉलीवूडचा चित्रपट. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चर्चेत आहे व त्याचा वापरही वाढत आहे, पण १९६७ साली तयार झालेल्या या चित्रपटात रूढार्थाने या चित्रपट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी भाष्य केले होते. त्यात असलेला चांद्रयान आणि गुरुत्वाकर्षणविरहित तंत्रज्ञानाचा उल्लेख आपल्याला काळाच्या खूपच पुढे घेऊन गेला होता. त्या चित्रपटात असलेला ‘HL 9000’ हा कॉम्प्युटर जेव्हा चित्रपटातील दोन अवकाशवीरांना ठार मारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो चित्रपट काळाच्या कितीतरी पुढे आहे हे जाणवते.
(लेखक ऑस्कर अकादमी सदस्य आहेत.)