मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजप आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूचे बिनसले असून जेडीयूने सरकारचा पाठिंबा काढून घेत आज भाजपला धक्का दिला. 2022च्या निवडणुकीत मणिपुरात जेडीयूच्या 6 जागा निवडून आल्या होत्या. काही महिन्यांतच त्यातील 5 आमदार भाजपवासी झाले. त्यानंतर जेडीयूकडे मोहम्मद अब्दुल नसीर हे एकमेव आमदार उरलेत. ते आता विरोधी बाकावर बसतील. त्याचे पडसाद बिहार व केंद्रातही येत्या काळात उमटू शकतात.