कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड असा टी -20 सामना बुधवारी झाला. या सामन्यात टीम इंडियाने 7 गडी अन् 43 चेंडू राखत जबरदस्त विजय मिळवला आहे. अवघ्या 13 षटकात टीम इंडियाने इंग्लंड संघाला धूळ चारली आहे. नाणेफेक जिंरत टीम इंडियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाडी करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारित 20 षटकात सर्व बाद 132 धावा केल्या. विजयासाठी टीम इंडियासमोर 133 धावांचे लक्ष्य होते.
टीम इंडिया फलंदाजीसाठी आल्यावर सलामीवीर अभिषेक शर्माच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने हे आव्हान सहज पार केले. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ईडन गार्डन्सच्या मैदानात नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. अर्शदीप सिंग याने संघाला चांगली सुरुवात करत इंग्लंड संघाला धक्क्यावर धक्के दिले. त्यानंतर वरुण चक्रवर्तीनं एकाच षटकात दोन गडी बाद करत इंग्लंडला डाव कमकुवत केला. उप कर्णधार अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले. इंग्लंडच्या संघाकडून जोस बटलरने 44 चेंडूत 68 धावा केला. त्याचा अपवाद वगळता अन्य कुणालाही चांगला खेळ करता आला नाही. इंग्लंडच्या संघाने निर्धारित 20 षटकात सर्व बाद 132 धावा केल्या होत्या.
टीम इंडिया फलंदाजीसाठी उतरताच इंग्लंडने दिलेले 133 धावांचे लक्ष्य फक्त 12.5 षटकांत पूर्ण केले. या विजयाचे नायक अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती ठरले. अभिषेकने फक्त 20 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने 6 षटकार आणि 3 चौकार मारले. त्याच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 12.5 षटकांत 7 गडी राखत सामना जिंकला आहे. अशाप्रकारे टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईमध्ये होणार आहे.