Chhattisgarh News – सिमेंट प्लांटमधून विषारी वायू गळती, 38 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली

छत्तीसगडच्या बलौदा बाजारात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे.येथे अचानक एका सिमेंट प्लांटमधून विषारी वायू लीकेज झाल्याने 38 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, काहींना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तर अनेक विद्यार्थी बेशुद्ध पडले. ही घटना खपराडीह गावातील एका सरकारी शाळेतील आहे. या घटनेने शाळेत एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारीऱ्यांसह पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. 38 विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आळे. तर काहींची जास्त तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.