बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) ने मणिपूरमधील एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे आणि त्यांचा एकमेव आमदार हा आता विरोधी बाकांवर बसणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. या घडामोडीचा सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसला तरी, हा एक मजबूत संदेश जात असल्याचं बोललं जात आहे. जेडीयू केंद्रात आणि बिहारमध्ये भाजपचा प्रमुख मित्र आहे.