AI च्या मदतीने 48 तासांत होणार कर्करोगाचे निदान ते लसीकरण! ORACLE च्या CEO चा दावा

जगभरात सध्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर रशियाने कर्करोगाची लस तयार केल्याचा दावा केला होता. अशातच रशियानंतर आता अमेरिकेतील ओरॅकल या कंपनीचे सीईओ लॅरी एलिसन यांनी मोठा दावा केला आहे. कर्करोगाचे निदान शोधण्यापासून ते लसीकरणापर्यंत सर्व काही 48 तासांत करता येईल, असा दावा लॅरी एलिसन यांनी केला.

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या सहाय्याने कर्करोगाचे निदान लावण्यापासून ते थेट कर्करोगाची लस बनवण्यापर्यंतचे काम हे फक्त 48 तासांत केले जाऊ शकते. जर कर्करोगाचे निदान लवकर झाले, तर लवकर उपचार देखील घेता येतील. भविष्यात हे लवकरच होईल, असा विश्वास लॅरी एलिसन यांनी व्यक्त केला.

लॅरी एलिसन यांना त्यांच्या दाव्यानुसार कर्करोगाची लस तयार करण्यात यश आले, तर कर्करोगासारख्या घातक आजारावर लस तयार करणारा अमेरिका हा दुसरा देश ठरेल. अमेरिकेने ही लस लवकरात लवकर बनवणे महत्त्वाचे आहे. रशियाने केलेल्या दाव्यानुसार 2025 पासून त्यांच्या देशात कर्करोगाचे लसीकरण सुरू होईल. रशिया आपल्या नागरिकांना ही लस मोफत देणार आहे. अशा स्थितीत या मोठ्या कामगिरीत अमेरिकेचा दावा खरा ठरतो का? हे पाहणे गरजेचे आहे.

फ्लोरिडामध्ये 4 रुग्णांवर लसीची चाचणी

कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत अनेक पावले उचलली जात आहेत. मे 2024 मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 4 कर्करोग रुग्णांवर कर्करोगाच्या लसीची चाचणी केली. लसीकरणानंतर अवघ्या दोन दिवसांनी रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती विकसित झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला होता.

Cancer Vaccine – 2025 पासून मिळणार कर्करोगावर फ्री वॅक्सीन! रशियाचा मोठा दावा