घशात गोळी अडकली आणि श्वास घ्यायला त्रास… झीनत अमानने सांगितला भयंकर अनुभव

70च्या दशकांत बॉलिवूड गाजवणाऱ्या झीनत अमान सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. मात्र सध्या त्या चर्चेत आल्या आहेत ते त्यांच्या एका इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे. नुकतेच त्यांनी इन्स्टावर एक भलीमोठी पोस्ट शेअर करत त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला आहे. ज्यामध्ये त्यांनी गोळी घशात अडकली अन् थोडक्यात बचावल्याचे सांगत आयुष्यात काही कठीण प्रसंगात कृतीपेक्षा संयमाची जास्त आवश्यकता असल्याचे सांगितले.

झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी गोळ्यांमुळे काल रात्री माझ्यासोबत काय झाले ते सांगू इच्छित आहे. झीनतने पुढे लिहिले की, ‘अंधेरी पूर्व येथील एका स्टुडिओमध्ये शूट पूर्ण झाले होते. मी घरी परतल्यावर लिली खूप खुश होती, मी तिच्याकडे लक्ष देऊन पुन्हा माझ्या कामाला लागले. मला झोपण्यापूर्वी रक्तदाबाचे औषध घ्यावे लागते. इथूनच वेदनेची सुरुवात झाली. मी औषध तोंडात घातले आणि पाणी प्यायले. त्यावेळी वाटले की मला श्वास घ्यायला त्रास होतोय. एक छोटी गोळी माझ्या घशात अडकली होती. ती बाहेरही येत नव्हती आणि गिळताही येत नव्हती. मी पाणीवर पाणी पित होते. मात्र ती गोळी काही केल्या बाहेर येत नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

झीनत पुढे म्हणाली, ‘त्यावेळी घरात माझ्यासोबत एक कुत्रा आणि पाच मांजरींशिवाय कोणीही नव्हते. फारच अस्वस्थ वाटायला लागले. डॉक्टरांचा नंबर एन्गेज होता म्हणून मी माझा मुलगा जहान खानला फोन केला. तो लगेच धावत आला. मी त्याची वाट पाहत असताना माझ्या घशातील वेदना वाढत होती. ती अडकलेली गोळी बाहेर येत नसल्याने अस्वस्थता वाढत होती. मला श्वास घ्यायला त्रास होत होता. यानंतर जहान आला आणि तत्काळ डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितले की गोळी कालांतराने विरघळेल. मी गरम पाणी पिऊन वाट पाहत काही तास घालवले. सकाळी उठल्यावर मलाच शरमल्यासारखे झाले. असे कठीण प्रसंग माणसाच्या आयुष्यात नेहमीच येतात. यासाठी कृतीपेक्षा संयमाची आवश्यकता असते हे मात्र कळले.